Friday, 16 October 2026

देह, श्रम आणि संवेदनांचा चित्र अवकाश

चरणदास जाधव यांच्या चित्रांचे प्रदर्शन निपॉन आर्ट गॅलरी येथे भरले आहे. चरणदासचा विद्यार्थी असल्यापासूनचा कलाप्रवास मला जवळून माहीत आहे. त्याची कलानिर्मिती, चित्रांविषयीची आस्था आणि स्वतःच्या अनुभवविश्वाशी प्रामाणिक राहून चित्रांकडे पाहण्याची त्याची वृत्ती या सगळ्यांचा विचार करता, त्याचे हे प्रदर्शन आवर्जून पाहावे असे आहे.

चरणदास आपल्या सभोवतालच्या भवतालाकडे केवळ दृश्य म्हणून पाहत नाही, तर त्यामागील जीवनानुभवांचा आणि संवेदनांचा तो गांभीर्याने विचार करतो. त्याच्या जडणघडणीत रुजलेल्या ग्रामीण आणि आदिम संवेदना त्याच्या चित्रांना एक वेगळे परिमाण देतात. आपल्या मातीशी, माणसांशी आणि त्यांच्या जगण्याशी असलेले त्याचे नाते त्याच्या चित्रांमधून सातत्याने व्यक्त होत राहते.
त्याच्या चित्रांमध्ये मानवी देहाचा एक वेगळाच सलोखा जाणवतो. हा देह केवळ शरीररचनेचा विषय राहत नाही, तर तो अनुभवांचा, स्पर्शाचा, श्रमाचा आणि जगण्याच्या असंख्य खुणांचा वाहक बनतो. वस्त्राच्या आत असलेल्या देहाच्या अस्तित्वाचे भान हे त्याच्या चित्रांच्या सौंदर्याचे एक महत्त्वाचे गमक आहे. वस्त्र आणि देह यांच्यातील संबंध, देहाची लय, त्याचा स्पर्श आणि त्यातून जाणवणारे जीवन यांविषयीची त्याची संवेदनशीलता चित्रांना एक अंतर्गत आशय देते.


चरणदास चित्र कधीही केवळ सजवण्यासाठी काढत नाही. त्याच्यासाठी चित्र हे बाहेरील सौंदर्याची निर्मिती करण्याचे साधन नसून, अनुभवांच्या अंतरंगात प्रवेश करण्याचे साधन आहे. त्यामुळे त्याच्या चित्रांतील सौंदर्य हे वरवरच्या आकर्षणात नसून, विषयाशी असलेल्या त्याच्या भावनिक आणि वैचारिक नात्यातून आकाराला येते.

मानवी संवेदनांच्या अनेक गुपितांची त्याला जाणीव आहे. माणसाच्या जगण्यात दडलेले भावविश्व, त्याच्या देहबोलीतून व्यक्त होणारे अनुभव आणि शब्दांतून सहज व्यक्त न होणाऱ्या भावना तो आपल्या चित्रांमधून उलगडण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या चित्रांकडे पाहताना जाणवते की, तो माणसाला केवळ एक दृश्यरूप म्हणून चित्रित करत नाही, तर त्याच्या अस्तित्वाचा आणि जगण्याचा शोध घेत असतो.

चरणदास करिता श्रमिकांचे जीवन हा विशेष आस्थेचा विषय आहे. श्रमातून आकाराला येणारे जीवन, श्रमिकांच्या वाट्याला येणाऱ्या वेदना, भय आणि त्यांच्या जगण्यातील सहजता यांविषयी त्याला असलेली आत्मीयता त्याच्या चित्रांमध्ये दिसून येते. या प्रदर्शनात त्याला भावलेले कामगार जीवन त्याने संवेदनशीलतेने अधोरेखित केले आहे. येथे श्रमिक केवळ चित्राचा विषय राहत नाहीत, त्यांच्या देहातून, हालचालींतून आणि अस्तित्वातून जीवनाचा एक व्यापक आशय व्यक्त होतो.
चरणदासच्या व्यक्तिमत्त्वात आणि चित्रनिर्मितीत एक प्रकारची नैसर्गिक सहजता आहे. तो जसा आहे, तसाच विचार करतो. स्वतःच्या अनुभवविश्वाशी विसंगत असलेले किंवा केवळ बाह्य प्रभावातून आलेले अनैसर्गिक बदल त्याला मान्य नाहीत. त्याच्या चित्रांमध्येही हीच प्रामाणिकता जाणवते. कोणत्याही कृत्रिम आवरणाचा आधार न घेता, आपल्या अनुभवांशी निष्ठावान राहून चित्रनिर्मिती करणे, हे त्याच्या कलाप्रवासाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.


चरणदासच्या चित्रांकडे पाहताना त्याचा चित्रविषयाशी असलेला दीर्घ सहवास, सूक्ष्म निरीक्षण आणि चित्रनिर्मितीविषयीची आंतरिक ओढ जाणवते. तो आपल्या चित्रविषयाशी इतका सहजपणे एकरूप होतो की, त्याच्या अनुभवांचे आणि संवेदनांचे प्रतिबिंब चित्रांतून स्वाभाविकपणे उमटते. देह, त्याची ठेवण, हालचाली आणि त्यातून व्यक्त होणारे जगणे यांच्याशी त्याचे एक जवळचे नाते आहे. दृश्याच्या पलीकडे जाऊन त्यातील संवेदना टिपण्याची त्याची वृत्ती त्याच्या चित्रांना एक वेगळी आंतरिक लय देते. त्याच्या चित्रांतील हा जिवंतपणा कोणत्याही वरवरच्या कलात्मक आविष्कारातून आलेला नाही, तो त्याच्या जगण्याशी, अनुभवांशी आणि चित्रनिर्मितीच्या सातत्यपूर्ण ध्यासाशी जोडलेला आहे.
चरणदासच्या या प्रदर्शनाकडे पाहताना त्याच्या चित्रांतील देह, श्रम, स्पर्श आणि ग्रामीण-आदिम संवेदना यांचा परस्परसंबंध लक्षात घ्यायला हवा. कारण त्याच्या चित्रांचे महत्त्व केवळ चित्रित केलेल्या विषयांमध्ये नसून, त्या विषवस्तूकडे पाहण्याच्या त्याच्या स्वतंत्र आणि आस्थापूर्ण दृष्टिकोनात आहे.
चरणदास जाधव यांचे हे प्रदर्शन म्हणजे माणसाच्या देह, श्रम आणि जगण्याच्या अनुभवांतून व्यक्त होणाऱ्या तरल संवेदनांची अभिव्यक्ती शोध.
चरणदासच्या कलाप्रवासातील हा टप्पा अनुभवण्यासाठी आणि त्याच्या चित्रांशी संवाद साधण्यासाठी हे प्रदर्शन सर्वांनी आवर्जून पाहावे, असे मला मनापासून वाटते.
चरणदास जाधव यांना या प्रदर्शनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!!
चरणदास जाधव यांच्या चित्रांना अर्थपूर्ण अवकाश उपलब्ध करून देणाऱ्या क्युरेटर स्नेहल तांबुलवाडीकर / खेडकर आणि निपॉन आर्ट गॅलरीचे संचालक प्रेमचंद ताठी यांचे मनःपूर्वक अभिनंदन! कलावंत आणि रसिक यांच्यात समृद्ध कलासंवाद घडवून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना हार्दिक शुभेच्छा!!!



डॉ. गणेश तरतरे
अधिष्ठाता,
स्कूल ऑफ फाईन अॅड अप्लाईड आर्ट,
एमआयटी विद्यापीठ, पुणे

Labour Diary Array of thoughts of Charan Jadhav Drawings| Paintings | Sculptures

There are bodies that build, and bodies that desire. Bodies that carry, lift, break, touch, embrace, endure. In Charan Jadhav’s Labour Diary, these are not separate bodies. They are one and the same—vulnerable, desiring, exhausted, intimate, possessing ceaseless capacities.

Artist: Charandas Jadhav

For a long time now Charan’s practice has been obsessed with the human body. What began as a very interesting exploration of mutilated animals transcended to violated flesh. The act of violation further led him to psychosexual turmoil of the physical body taking him to the not so gentle lanes of flesh trade. For years Charan wandered in the red light areas in and around Bombay documenting and reflecting on the lives of the women practicing prostitution. His line expressed the complex emotional retaliation of their lives he felt for them, turning his works to an odd combination of disgust, pity and erotica simultaneously. What we see happening in this show parabolic slide to looking at bodies in turmoil, as Charan has moved from one form of physical labour to another. While he looked as sex workers and their consumers as bodies in vigour and decay, he continues to do the same with labour on site not very different. The passion here is much more raw, as loneliness and distance acting as triggers for active erotic imagination.

Charan here presents not only the world of labour, he is very much part of it- construction sites, workers, tools, raw materials and structures in the process of becoming. His labourers are not distant figures observed from the outside. Their bodies hold the marks of work—the weight of what is carried, the repetition of gesture, the fatigue of the everyday. Their hands become both instruments and witnesses. They build the world, even as the world leaves its traces upon them. The tools transform into memories of pleasure and objects of desire as an innocent tape or digger surreally become genitals.

But labour, in Jadhav’s universe, does not end at the construction site.

Nippon Gallery Mumbai

His very delicate, yet direct erotic drawings are another kind of physical encounter: the private, tender and erotic labour of intimacy. Here, the body is no longer seen only as a body that works, but as a body that longs, touches, gives and receives. These drawings carry the vulnerability of allowing the intimate to become visible. Desire is treated neither as spectacle nor as confession, but as another deeply human form of making—a coming together from which something new might emerge.

It is this movement between construction and creation that gives the works their emotional force. Jadhav’s tools begin to mutate into sexual and reproductive forms. The hammer, pipe, drill and other implements of construction acquire the contours of flesh and anatomy. The objects through which we build our external world begin to resemble the organs through which we create life. The distinction between tool and body, production and reproduction, begins to tremble.

In these transformations, the construction site becomes strangely intimate. Metal begins to feel bodily; flesh begins to feel architectural. The language of labour slips into the language of desire, and the act of building becomes inseparable from the impulse to create, connect and continue.

Perhaps this is where the diary becomes most personal. Beneath the images of workers and tools lies a meditation on what it means to spend oneself in the world—to give one’s strength, one’s time, one’s body, and sometimes one’s love. Every structure is built through an expenditure of the body. Every relationship asks for another kind of labour. Every life carries the evidence of what has been given to it.

Labour Diary is therefore not simply a record of work. It is a diary of the body itself: its labour and its longing, its exhaustion and its tenderness, its capacity to build and its need to be held. What remains is the trace of the human hand—on stone, on metal, on another body, and finally, on life itself.

 

 

Snehal Tambulwadikar-Khedkar

Art Historian, Artist, Academician


Curated by Snehal Tambulwadikar

Labour Diary | Solo Exhibition

Nippon Gallery is pleased to present “Labour Diary”, a solo exhibition by Charandas Jadhav, bringing together an array of thoughts expressed through drawings, paintings and sculptures.

The exhibition reflects on labour, everyday life, observation and the human experience, presenting the artist’s personal visual language through a diverse body of work.

📅 Preview: 13 October 2026

🕔 5:00 PM onwards

📅 Exhibition: 13–17 October 2026

🕒 3:00 PM – 7:00 PM

📍 Nippon Gallery

Flora Fountain, Fort, Mumbai – 400001