Wednesday 20 May 2015

Coming soon : Art Dose Cartoon: 1st May 2015 ( Every month 1st Date )


SAVE ARTIST : SAVE Art & Culture 

If you like ...like it ..comment and share ..Do not be shame !!!



Copyright by Art Blogazine.com/ 2015

अशोक हिंगे यांची - सजीव रेखाटन - चित्रमालिक

कल्पकतेला सीमा नसते, कुठलीही गोष्ट प्रेरणा स्त्रोत्र होऊ शकते किंवा कुठेही प्रेरणा मिळू शकते. त्यासाठी फक्त कलाकारी अन्तःप्रेरणा असली पहिजे. चित्रकार अशोक हिंगे आपल्या चित्रांतून हे सिद्ध करतातआपल्या  'सीरीज ऑफ डेली लाइफ़' द्वारे ते कल्पकतेने सांसारिक नित्यक्रमांचा सम्मान करतात. छोट्या शहरातून आलेल्या अशोक यांनी छोट्या आणि मोठ्या शहरातील भिन्न जीवन शैली अनुभवल्या आहेत. त्यांची  हे मोठ्या शहरातील जीवनचर्याची चित्रंते सध्या जिथे वास्तव्य करत आहेत त्या सामाजिक जीवना बद्दलचे दर्शन घडवते. ते बऱ्याच वर्षांपासून मुंबईत रहात आहेत, ह्या शहराचा एक भाग झाल्यामुळे, ते ह्या शहराच्या वेगवान गतीने जगण्यास अभिप्रेरीत झाले आहेत. ह्या धावपळीच्या जंजाळात नजरअंदाज केलेल्या हलक्या फुलक्या क्षणांना ते अवगत करून आपल्या चित्रांत जागृत करतात. आपण दर्शक जेव्हा हे क्षण चित्रांच्या माध्यमातून बघतो, तेव्हा आपल्याला कुठेतरी आपण त्या चित्रात आहोत अशी जाणीव होते. ही चित्र आपल्या आठवणी ताज्या करतात आणि अशी उसंत वेळ मिळण्याची इच्छा  जागृत होते, कारण अशाच क्षणांच्या आनंदातून स्वतःला स्फूर्ती  मिळते. साधारणतः चित्रकार चिंतनशील, असाधारण विचार किंवा लहरी प्रमाणे चित्र रेखाटतात, पण अशोक हे वेगळ्या पद्धतीने म्हणजे पांढऱ्या कॅनवास वर काळ्या इंकने वेगवेगळे हालचाली टिपतात. जसे कि प्रेम करणारे, वेगवेगळे खेळ खेळणारे, वाद्य वाजवणारे, नाचणारे, चिंतन करणारे, मेहनतीचे काम करणारे, विश्रांती घेणारे, रेल्वे प्रवासी, कॉफीचा आस्वाद घेणारे, ऑफिसमध्ये काम करणारे आणि परिवाराबरोबर हसत खेळत असलेली नाती  दर्शवितातहि चित्र दर्शकांना वेगळ्या शैलीमुळे मोहून टाकतात. हि चित्रमालिका म्हणजे एक प्रकारचे रोजच्या दैनंदिन जीवनाचे दस्तऐवजच आहेत.  
अशोक हिंगे यांची  - सजीव रेखाटन
         
अशोक मान्य करतात की हा विषय आणि ही शैली त्यांच्या चित्रकार म्हणून प्रगतीची वाटचाल आहे. पूर्वी ते विशेष आकृत्या रंगवीत असत. त्यांनी निम-अमूर्त निसर्गचित्रंही रंगवली आहेतसुरुवातीला ते सुलेखन (Calligraphy) करायचे आणि त्यामुळे त्यांना काळ्या रंगाच्या स्ट्रोक्सचे आकर्षण आणि प्रेम आहे. रॉबर्ट मदरवेल हे त्यांचे आवडते चित्रकार कारण ते मोहक स्ट्रोक्स काढत असत. मार्क रोथकोची किमानचौकटप्रबंधक शैलीचेही ते अनुसरण करतात त्यामुळे त्यांची चित्र साधी आणि आकर्षक वाटतात. सतत काही वर्षांपासून ह्या शैलीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे आता त्यांचे स्ट्रोक्स सफाईदार झाले आहेत आणि त्यामुळे ते आपल्या आशयाचा सार खऱ्या अर्थाने साध्य करतात आणि सामान्य विषयाला अद्वितीय करतात. ही  शैली फक्त त्यांच्या सध्याच्या चित्रांतच दिसते असे नाही, त्यांनी केले इन्सटोलेशन, ज्याची त्यांच्या मित्रांनी खूप प्रशंसा केली, ते म्हणजे, 'गुरु शिष्य'  इन्सटोलेशनही ह्याच शैलीतले आहे. अशोक हीच शैली सुरु ठेऊ इच्छित आहेत

अशोक यांची या विषयातील रुची त्यांचा जिज्ञासू स्वभाव आणि प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घेण्याची लालसा दर्शविते. लीओनार्डो विन्ची, सर्वांचेच आवडते कलाकार, यांनाही अशीच सवय होती, सगळ्या सामान्य हरकती जे त्यांचे लक्ष आकर्षित करीत, ते त्याची नोंद स्केच च्या रुपात स्वतः बरोबर सतत ठेवलेल्या वहीत करत. मानवी जीवशास्त्र ते वनस्पतीशास्त्र सर्वच त्यांची जिज्ञासा चेतवत. त्यांनी हजारोंच्या वर स्केच केले होतेअशोक हिंगे सुद्धा आपल्या बरोबर कायम पेपर ठेवतात आणि त्यांचे लक्ष वेधून घेणारे दृश्य किंवा विषयाचे स्केच करतात. अशोक यांची जिज्ञासू वृत्ती आणि जाणीव लीओनार्डो विन्ची सारखीच वाटतेसामान्य्याला बहुमुल्य बनविणे!     
अशोक हिंगे यांची  - सजीव रेखाटन

ह्या सिरीजमधे ब्रशच्या एकाच स्ट्रोक्सने काढलेल्या आकृत्या आहेत. क्रिया आणि हाव भाव अमूर्त रुपात आहेत. सगळी चित्रं किमान चौकटप्रबंधक शैलीतकुठल्याही गुंतागुंती शिवाय रेखाटलेली आहेत. हि चित्रं काळ्या रंगाच्या वापरामुळे अजूनच प्रभावी वाटतात. सगळी चित्रं  काळ्या रंगात आहेत कारण हा अशोकच्या पसंतीचा रंग आहे. त्यांच्यासाठी काळा रंग सुंदरतेचा प्रतिक आहे आणि निश्चितच कशाही बरोबर मिसळून जातो, पण स्वतःचा छाप ठेवतो. शिवाय, काळ्या रंगाचा ठसा दर्शकांच्या अंतरंगावर खूप काळ  उमटतो. एकूणचसाधेपणा ही ह्या चीत्रमालीकेची सुंदरता म्हणावी लागेल.


हे प्रदर्शन १८ मे ते १९ जून ह्या कालावधीत दिनोदिया १ x १ आर्ट ग्यालरी, बजाज भवन, नरिमन पोइन्त, मुंबई  येथे आहे. वेळ : सकाळी ११ ते संध्याकाळी ६ पर्यंत - दररोज (रविवारी बंद)