Thursday 2 October 2014

प्रश्न असा- कला-जीवन कि जीवन-कला? by Pankaja JK.

प्रश्न असा-
कला-जीवन कि जीवन-कला?
Pankaja JK.

ACT-I

प्रोफेसर: तुला रेवथी बद्दल काय जाणून घ्यायचे आहे? (करण रेवथी जवळ जाताच) त्याला हात लावू नकोस!

करण: ह्या शिल्पात मला तिचा आत्मा जाणवतो, इतके जिवंत प्रतिक होते की, ती इथेच कुठेतरी आहे असे वाटतेविचारांत गुंतलेली …दुर वाटेवर नजर लावून कुणाची तरी वाट बघत… 

प्रोफेसर: Who the hell are you? कोण आहेस तू?

करण: तुम्ही सांगायचे आहे प्रोफेसर, रेवथी कोण आहे?

प्रोफेसर: मला सत्य आणि कलेतील फरक विचारतोस?

करण: मी खऱ्या रेवथी बद्दल बोलतो आहे. 

प्रोफेसर: ह्या शिल्पाचा आणि रेवथीचा काहीही संबंध नाही. 

करण:मग हे शिल्प स्वयंभू आहे?

प्रोफेसर: मला वाटत तुझ्या समीक्षेचा काहीच उद्देश नाही आहे. बाकीचे exhibition बघ आणि चालायला लाग. माझ्या कलेबद्दल लिहिण्याची काही गरज नाही आहे. 

करण: आम्हाला समीक्षा करण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज लागत नाही.  

प्रोफेसर: तुझे नाव??? हां! करण, तर आत्मविश्वासी करण, एक सांग तुम्ही लोकं पोट भरण्यासाठी दुसऱ्याचे आयुष्य expose का करता? असे दुसऱ्यांना धमकावणे सोडा, सर्जनशील व्हा, काहीतरी creative करा.   

करण: मान्य आहे, पण हे जर धमकावणे वाटत असेल तर तुमच्या कामाबद्दल कोण लिहिणार? जर मी नाही लिहिले तर हे दगडज्यांना तुम्ही कलाकृती म्हणता, वजनाच्या भावाने विकले जातील.  

प्रोफेसर: (रागात एक शिल्प फोडत) आश्चर्य वाटलं?  तुझ्या म्हणण्याप्रमाणे हा दगड आहे ना? मी फोडला! तुला शिल्पकार आणि दगद फोड्यातील फरक माहिती आहे का? एका दगड फोड्याचे काम असते यांत्रिकपणे दगड फोडणे, तो त्याचा व्यवसाय अस्तो. पण शिल्पकार दगडाला आकार देताना विचार करतो, विचारांती शिल्प तयार होते, ऐतिहासिक रचना होते. प्राचीन काळातील दगडांवर कोरलेल्या आकृत्या, त्यांचे सांकेतिक भाष्य कोरीव कामात दडलेल्या माहिती, त्याबद्दल तुला काय म्हणायचे आहे? ते कोरणारे दगड फोडे होते कि शिल्पकार?

करण: म्हणजे … 

प्रोफेसर म्हणजे, तुला काय वाटलं? कला काय आहे? तुला वस्तूंतील गुण कळतात?

करण: असेलही, नाही कळत, पण प्रोफेसर इथे प्रश्न वस्तूंचा नाही, स्त्रीचा आहे. तुम्हाला स्त्रियांच्या गुणांनबद्दल काहीच कळत नाही. …… 



ACT-II
.....
प्रोफेसर: तुला काय म्हणायचे आहे, स्पष्ट बोल. 

करण: तुम्ही तर '' म्हणता ताक ओळखता! एक सांगा, प्रत्येक कलाकाराची कुणीतरी  प्रेरणा असते, त्यातून निर्माण केलेली कलाकृती त्याच्या स्वतःच्या आयुष्याइतकीच मोलाची असते न?

प्रोफेसर: हो, अगदी खर आहे. त्या कलाकृतीचे मोलच नसते. 

करण: तुम्ही सगळी शिल्प विकलीत, मग रेवथी का नाही? ती विकणारच नाही, असे ठाम का आहात? का? कोण आहे ती?

प्रोफेसर: करण! काहीही अर्थ लावण्याचा प्रयत्न करू नकोस. आपल्या समीक्षेला कल्पकता देऊ नकोस. मी फक्त एक शिल्पकार आहे. तुझ्या सारखेच मला हे शिल्प जिवंत भासते, त्यातील आत्मा मला आकर्षित करतो. बस्स! एवढेच!

करण: मग विकून टाका.  

प्रोफेसर करण!! नाही, कधीच नाही … 

करण: कारण?

To be continued....( please send feedback to writer pankajajk@gmail.com)
Published for one-time use only with permission from Pankaja JK.

(A still  and image- for illustrative purpose only / no copyright)