The work of Sejal Patil unfolds at the intersection of body, memory, and lived experience. Rooted in deeply personal realities, her practice transforms pain into a visual language that is both intimate and universal. In her paintings, the body is not merely a physical form but a site of endurance, vulnerability, resistance, and transformation.
Emerging from prolonged illness and the experience of being unheard within medical spaces, her work reflects a profound awareness of how women’s bodies are often observed, interpreted, and regulated — yet rarely fully listened to. What might appear as fragility in her imagery reveals itself instead as strength: a quiet but persistent act of reclaiming voice, presence, and agency.
![]() |
| Artist: Sejal Patil |
Each canvas becomes a space where interior experiences take form — where silence finds texture, and emotional memory becomes visible. Her practice does not simply narrate suffering; it reshapes it, allowing moments of confinement to open into reflection, release, and healing. The personal, in her work, becomes a shared emotional landscape.
This exhibition invites viewers into a space of attentiveness and care — one that encourages stillness, empathy, and introspection. To encounter these works is to be reminded that the body remembers, the body speaks, and through art, it can also begin to mend.
— Curated by Heena Ravindra Uchhe
क्युरेटर नोट
सेजल पाटील यांच्या कलाकृती शरीर, स्मृती आणि जगलेल्या अनुभवांच्या संगमातून उलगडतात. अतिशय वैयक्तिक वास्तवातून उगवलेली त्यांची कलाप्रक्रिया वेदनेचं रूपांतर एका अशा दृश्यभाषेत करते जी एकाच वेळी अंतर्मुख आणि सार्वत्रिक आहे. त्यांच्या चित्रांमध्ये शरीर हे केवळ भौतिक स्वरूप नसून सहनशक्ती, असुरक्षितता, प्रतिकार आणि रूपांतर यांचं जिवंत क्षेत्र बनतं.
दीर्घकाळाच्या आजारपणातून आणि वैद्यकीय व्यवस्थेत स्वतःचा आवाज न ऐकला जाण्याच्या अनुभवातून त्यांच्या कामात स्त्रियांच्या शरीरांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची सखोल जाणीव दिसून येते — जिथे शरीराचं निरीक्षण, विश्लेषण आणि नियंत्रण केलं जातं, पण त्याला पूर्णपणे ऐकलं जात नाही. त्यांच्या प्रतिमांमध्ये दिसणारी नाजूकता ही प्रत्यक्षात एक शांत पण ठाम सामर्थ्य आहे — स्वतःचा आवाज, अस्तित्व आणि अधिकार पुन्हा मिळवण्याची प्रक्रिया.
प्रत्येक कॅनव्हास एक अशी जागा बनतो जिथे अंतर्मनातील अनुभव आकार घेतात — जिथे मौनाला पोत मिळतो आणि भावनिक स्मृती दृश्यरूप धारण करतात. त्यांची कला केवळ वेदनेची नोंद करत नाही; ती तिचं पुनर्रचन करते, बंदिस्त क्षणांना चिंतन, मुक्तता आणि उपचाराच्या दिशेने उघडते. वैयक्तिक अनुभव त्यांच्या कामात सामूहिक भावविश्वात रूपांतरित होतो.
हे प्रदर्शन प्रेक्षकाला संवेदनशीलता आणि सजगतेच्या अशा जागेत आमंत्रित करतं — जिथे थांबणं, जाणवणं आणि अंतर्मुख होणं महत्त्वाचं ठरतं. या कलाकृतींशी संवाद साधताना आपल्याला जाणवतं — शरीर स्मरण ठेवतं, शरीर बोलतं, आणि कलेच्या माध्यमातून ते हळूहळू स्वतःला पुन्हा सावरण्यास सुरुवात करतं.
— क्युरेटर: Heena Ravindra Uchhe

