Thursday 24 July 2014

Lizard Installation of Drawings by Tathi Premchand.

Tathi Premchand : चित्र, साहित्य असो वा शिल्प कलाकाराने आपले सामाजिक भान जपले पाहिजे. समाजात प्रबोधन घडण्यासाठी याच माध्यमाचा अवलंब करणे सोपे ठरते. त्यामुळे तथी प्रेमचंद आणि अशोक हिंगे यांनी आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून 'कलाभान' जपले आहे. सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यातील व्यथा आर्ट इन्स्टॉलेशनमधून मांडल्याने काही क्षण आपल्याला प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतो, आणि तिथूनच विचारांचे चक्र सुरू होते हेच त्या कलाकाराचे यश आणि प्रबोधनाची नांदी मानली जाते.

काळानुसार माणसाची जडणघडण, वागणूक आणि बाह्यअवतार सर्वच बदलले आहे. याच बदलाच्या दोन्ही बाजू प्रेमचंद यांच्या कलाकृतीतून दिसून येतात. त्यांच्या चित्रांमध्ये मानवी चेहर्‍यामधून जगण्यासाठी धडपडणार्‍या असाहाय्य माणसांचे रेखाटन केले आहे. यामध्ये चिंतनशील आणि निश्‍चल मूड कोठेही दिसत नाही. या चित्रांमधून केवळ दरारा, तणाव, विस्मय, प्रश्न आणि सल दिसत आहे. आपण आपले आयुष्य तीक्ष्ण चाकूच्या टोकावर जगत आहोत. त्यातूनही आपण समाजातील अनेक व्यत्ययांशी संघर्ष करून आपल्या जगण्याचा मार्ग शोधून काढतो. हीच हळवी मूल्ये कागदावर पेन आणि पेन्सिल यांचा समन्वय साधून उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेमचंद यांनी विजेच्या बिलावर मानवी कवटीचे चित्र काढले आहे. वीज ही मानवाची गरज असूनही विजेचे दर पुरवल्या गेलेल्या विजेच्या तुलनेत खूप जास्त आहेत, जे मानवाचे शोषण करून त्याचे आयुष्य कमी करत आहेत. सामान्य माणसाच्या जगण्यातील ही व्यथा प्रेमचंद यांनी मांडली आहे.


Lokamt: Marathi 29th July 2014

(Advertisement)
26th July 4th August : SAVE DATE: ART TALK at 6 pm Art gate gallery, Churchgate Mumbai
Art Gate Gallery can be contacted at:022 4213 8855
or emailed at artgate.sc@gmail.com

(Note : This PRESS RELEASE for all Indian news paper and Media, leading PR Agency  and online social media, please share )

No comments:

Post a Comment

Thanks for comment JK